dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

घराला आग लागून दोन जण भाजले 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी परिसरातील सुभाष पेठ गणपती मंदिर जवळ एका घराला आग लागून दोन जण भाजल्याची घटना सोमवार , 26 जानेवारी रोजी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते.

छावणी परिसरातील सुभाष पेठ गणपती मंदिराजवळ राजेश दुबे यांच्या मालकीचे घर असून दुबे कुटुंबीय रविवारी रात्री जेवण करून झोपले होते. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास दुबे यांच्या घराला अचानकपणे आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले, दरम्यान घराला आग लागल्याचे लक्षात येताच दुबे कुटुंबीयांनी घराबाहेर धाव घेतली.  या धावपळीत अशोक दुबे,  रीना दुबे हे दोघे भाजले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top