dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

तरुणाला रॉडने बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

जालना :  गाडी जाळल्याच्या संशयातून एका तरुणाला रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवार, 22 नोव्हेंबर रोजी समोर आली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सागर भगवान आगलावे ( वय अंदाजे 18 वर्षे, रा. भवानीनगर, जालना ) असे मयत. तरुणाचे नाव आहे.

शहरातील भवानीनगर भागात काही दिवसांपूर्वी सागर आगलावे याला गाडी जाळल्याच्या संशयावरून 2 ते 3 जणांनी अडवून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच शनिवार, 22 नोव्हेंबर रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top