dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

व्हॅलेन्टाईन वीक वैगेरे, चिखली पोलिसांचा कॅफे चालकांना दम!  

चिखली : सध्या व्हॅलेन्टाईन वीक सुरू आहे.. प्रेमी युगल प्रेम यात्रेत बेधुंद असतात. अलीकडे कॅफेवर भेटण्याची प्रथा फारच प्रचलित झाली आहे. पण, जरा संभाळून! असं कॅफेचालकांना सांगव लागत आहे. नियमबाह्य पद्धतीने कॅफे चालविणाऱ्यावर आणि गैरप्रकारावर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहे. 

चिखली शहरात वाढत्या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी चिखली पोलीस स्टेशनकडून 6 फेब्रुवारी रोजी  विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात पारधी बाबा रोड तसेच काळे हॉस्पिटल परिसरातील विविध कॅफेवर अचानक धाड टाकून तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान नियमबाह्य वेळेत कॅफे सुरू ठेवू नयेत, तसेच कोणतेही बेकायदेशीर प्रकार आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे कॅफे चालकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, शहरात शिस्त राखण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मोहिमेत राजेंद्र काळे, विजय किटे, कडुबा मुंढे, अनिल वाघ, पंढरी मिसाळ, अजय इटावा, सागर सोनुने, मंजुषा चिंचोले व वृषाली खेडेकर यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top