वैजापूर : शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो वैजापूर पोलीसांनी बुधवार, 20 ऑगस्ट रोजी पकडला. या कारवाईत पोलिसांनी ६३ लाख रुपयांचा गुटखा व टेम्पो असा एकूण ८३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर येथून वैजापूरकडे गुटखा घेऊन एक टेम्पो जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून कोपरगावकडे गुटखा घेऊन हा टेम्पो क्रमांक (एमएच-०४-एलइ-३९५९) वैजापूर कोपरगाव रस्त्यावरील कादरी गॅरेज समोर अडवला. पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यात वेगवेगळ्या कंपनीचा शासनाने बंदी घातलेला गुटखा मिळून आला. तसेच अमरावती येथून गुटखा घेऊन मुंबईला जात असल्याचे टेम्पो चालकाने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरशे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक श्रीमन छोटेलाल प्रसाद (गोंड), गाव पकडी, पोस्ट फेफाणा, ता.जि. बलिया राज्य उत्तर प्रदेश याच्याविरूद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी टेम्पोचालकास अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, उपनिरीक्षक युवराज पाडळे, पोलिस अंमलदार आर. आर. जाधव, अमोल राजळे, कुलदिप नरवडे, प्रशांत गिते, सचिन रत्नपारखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.