dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गंगापूरला अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान | Unseasonal rains in Gangapur 

Unseasonal rains in Gangapur : अवकाळी पाऊस व गारपीटीने गंगापूर तालुक्यातील पिंपळगाव दिवशी, डोणगाव, रायपूर,  धामोरी, लासुर स्टेशन, खडक नारळा, माळीवाडगाव परिसरात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. गारपीटीने कांदा, मक्का, ज्वारी, बाजरी ही पिके अक्षरश: भूईसपाट झालेली आहे.

लासुर स्टेशन : अवकाळी पाऊस व गारपीटीने गंगापूर तालुक्यातील पिंपळगाव दिवशी, डोणगाव, रायपूर,  धामोरी, लासुर स्टेशन, खडक नारळा, माळीवाडगाव परिसरात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. गारपीटीने कांदा, मक्का, ज्वारी, बाजरी ही पिके अक्षरश: भूईसपाट झालेली आहे.

गंगापूर तालुक्यात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने डोणगाव मंडळातील वरझडी, पाडळसा, बाभुळगाव आदी सात गावांमध्ये कांदा, मका, ज्वारी, गहू ही पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहेत. दरम्यान, देऱ्हळ  बाभुळगाव, पाडळसा या गावांमध्ये सलग दोन तास अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे या भागातील केळी, मका, गहू, ज्वारी आदी पिके उध्वस्त झाली. सलग दोन दिवस अवकाळी पाऊस झाल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. महसूल विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरापाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

वडाळी येथे वीज पडूल बैलजोडी दगावली

धावडा : भोकरदन तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथून जवळच असलेल्या वडाळी, तालुका सिल्लोड येथील एका शेतकऱ्याच्या शेतात वीज कोसळून बैलजोडी ठार झाली आहे. शेतकरी नामदेव भागाजी जाधव यांनी शेत गट क्रमांक 28 मधील वेळूच्या बांबूला आपली बैलजोडी बांधलेली होती. अवकाळी पाऊस सुरू असतांना अचानक वीज कोसळल्याने जाधव यांचे दोन्ही बैल जागीच ठार झाले, तर एक गाय जखमी झाली आहे. गुरुवारी तलाठी विष्णू गवळी व पशुसंवर्धन अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला असून शेतकरी जाधव यांचे या दर्घटनेत जवळपास एक लाख 25 हजारांचे नुकसान झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top