dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

श्री क्षेत्र जाळीचादेव नगरीत बुधवारी एकता महामेळावा | Shri Kshetra Jalichadeo Nagari

Shri Kshetra Jalichadeo Nagari : मराठवाडा, विदर्भ व खानदेशच्या सीमारेशेवर वसलेल्या भोकरदन तालुक्यातील श्री क्षेञ जाळीचादेव महानुभावियांचे श्रद्धास्थान तसेच श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीत बुधवार, 8 एप्रिल रोजी महानुभाव पंथीय एकता समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

धावडा : मराठवाडा, विदर्भ व खानदेशच्या सीमारेशेवर वसलेल्या भोकरदन तालुक्यातील श्री क्षेञ जाळीचादेव महानुभावियांचे श्रद्धास्थान तसेच श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीत बुधवार, 8 एप्रिल रोजी महानुभाव पंथीय एकता समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

श्री क्षेत्र जाळीचादेव संत, महंत, ग्रामस्थ व पुजारी बांधव तसेच भोपे पुजारी, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कारंजेकर बाबा, कार्याध्यक्ष बिडकर बाबा यांचा सत्कार समारंभ तसेच ज्योतिषाचार्य प्रभाकर भोजने यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदग्रहण समारंभ पार पडणार आहे. या  कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे जल संपदा मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय रेल्‍वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, आमदार अर्जुन खोतकर, आमदार संजय गायकवाड, आमदार संतोष  दानवे, आमदार श्वेता महाले, आमदार बाळासाहेब सानप, उपजिल्हाधिकारी पंडित चोरमारे, शुभांगी नांदगावकर, प्रकाश ननावरे, गोविंद अग्रवाल, पंडित भूतेकर, महंत श्री लासूरकर बाबा, महंत खामणीकर बाबा, महंत लोणारकर बाबा, महंत मेहकरकर बाबा, महंत रुद्धपूरकर बाबा, महंत सुकिनकर बाबा, महंत चिचोंडीकर बाबा, महंत आंबेकर बाबा,महंत पाथ्रीकर बाबा, महंत भीष्माचार्य बाबा व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top