dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वाशिम पंचायत समितीसमोर १०१ नारळ फोडून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनाच्या वतीने वाशिम पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारी १०१ नारळ फोडून आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष बालाजी मोरे व युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तरी सद्बुद्धी मिळावी, या भावनेतून हे अनोखे आंदोलन करण्यात आले. विहीर, घरकुल, गोठा, फळबाग तसेच नरेगा अंतर्गत मंजूर अनुदानासाठी लाभार्थ्यांना वारंवार वाशिम पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागत असून, तरीही रक्कम खात्यावर जमा होत नसल्याचा आरोप संघटनेने केला.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे सामान्य लाभार्थ्यांना पायपीट करावी लागत असून, आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर आजतागायत अनुदान जमा न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. रखडलेले विहीर, घरकुल, गोठा, फळबाग व नरेगा अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली. या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top