dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अनुदान घोटाळ्यातील आणखी दोन आरोपी गजाआड

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा प्रकरणात आणखी दोन आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात जेरबंद केलेल्या आरोपींची संख्या आता 34 झाली असून या दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा प्रकरणात आणखी दोन आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात जेरबंद केलेल्या आरोपींची संख्या आता 34 झाली असून या दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

किशोर धोंडीबा थोरात 35, रा.शिवाजीनगर, घनसावंगी, तत्कालीन ऑपरेटर, अण्णासाहेब धर्मराज कोल्हे 44, रा.गुरूपिंप्री, एजंट असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून कोट्यावधी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. दरम्यान बोगस याद्या तयार करून या अनुदान वाटपात अपहार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर 240 गावांमधील या अनुदान वाटपात तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा अपहार झाल्याचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर याप्रकरणात मंडळ अधिकारी, 22 तलाठी व कर्मचाऱ्यांसह 28 जणांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. तेव्हापासून पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार घनसावंगी तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी आशिष प्रमोदकुमार पैठणकर रा. परतूर याला चार दिवसांपुर्वीच पोलीसांनी अटक केली होती. त्याने पोलीसांसमोर तोंड उघडल्यानंतर किशोर थोरात व अण्णासाहेब कोल्हे या दोन आरोपींची नावे समोर आली, यावरून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोन्ही आरोपींच्या मुस्क्या आवळल्या. त्यांना न्यायालयासमोर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अपर अधीक्षक आयुष नोपाणी, उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा सिध्दार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार जया निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top