नवी दिल्ली : अंडर- १९ वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देईल. भारताने शुक्रवारी अंडर-१९ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला १०० धावांनी हरवून सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर भारतीय खेळाडूंच्या जल्लोषाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. यात वैभव सूर्यवंशी भोजपुरी गाण्यावर नाचताना दिसला .

अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये वैभव सूर्यवंशी विजयाचा नायक ठरला. फायनलमध्ये १७५ धावांच्या खेळीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले, तर संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक षटकार मारल्यामुळे तो ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ देखील ठरला. त्याने ७ सामन्यांमध्ये ६२.७१ च्या सरासरीने ४३९ धावा केल्या, ज्यात ४१ चौकार आणि ३० षटकारांचा समावेश होता. ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ बनल्यानंतर वैभव म्हणाला, खूप छान वाटत आहे. मी हा पुरस्कार संपूर्ण सपोर्ट स्टाफला समर्पित करू इच्छितो.