अकोला : शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत अकोला व वाशीम जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा हा क्रीडा महोत्सव प्रेरणास्पद असून याने विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण होऊन ते क्रीडा क्षेत्रात तरबेज होतात असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक सुरेश देवकर यांनी केले.

शिवाजी शिक्षण संस्थेच्या क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन
अकोला : शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत अकोला व वाशीम जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा हा क्रीडा महोत्सव प्रेरणास्पद असून याने विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण होऊन ते क्रीडा क्षेत्रात तरबेज होतात असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक सुरेश देवकर यांनी केले.
शिवाजी विद्यालय शहर शाखा हरिहरपेठ व आयोजन समिती अकोला प्रभाग क्रीडा महोत्सव समितीतर्फे स्थानिक वसंत देसाई क्रीडांगणावर शिक्षण महर्षी तथा शिवाजी
शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जन्मदिना निमित्त आयोजित क्रीडा महोत्सवात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजाननराव पुंडकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य सुरेश खोटरे, संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक प्रमोद टेकाडे, शाळा तपासणी अधिकारी प्रकाश अंधारे, बाळकृष्ण मोहोड, प्रा. वाटाणे, प्रा. खांडेकर, विलासराव हरणे समवेत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजन व अतिथी स्वागताने या महोत्सवाचा प्रारंभ झाला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत या क्रीडा महोत्सवाची उपयुक्तता प्रतिपादित केली. या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या.
क्रीडा शिवाजी सायंकाळी महोत्सवातील अनेक विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, अविनाश बोर्डे, मुख्याध्यापक मनोज देशमुख,
समवेत विविध मुख्याध्यापक व मान्यवरांचे हस्ते शिल्ड, मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट खेळाडू व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रकाश अंधारे यांनी करून या वार्षिक क्रीडा महोत्सवाची माहिती दिली. संचालन अनुराधा मराठे यांनी तर आभार मुख्याध्यापक मनोज देशमुख यांनी मानले. यावेळी शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व क्रीडा रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
