dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

खोटी माहिती देऊन गोळीबार दडपण्याचा प्रयत्न करणारा गजाआड; आरोपीच्या घरातून गावठी पिस्तूल, तीन काडतुसे जप्त

वाळूज महानगर :  शिवराई फाटा परिसरात पिस्तुलाने केलेल्या गोळीबारात २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. प्रारंभी अपघाताचा बनाव करून प्रकार लपवण्याचा प्रयत्न झाला. मात्र वैद्यकीय अहवाल व पोलिसांच्या तत्पर चौकशीतून संपूर्ण प्रकरण समोर आले. वाळूज पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पोलिस उपनिरीक्षक वंदना मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी रात्री जवळपास सव्वा अकरा वाजेच्या सुमारास लिंबेजळगाव टोलनाका ते वाळूजदरम्यान ही घटना घडली. महेश दत्तात्रय पवार (२३ वर्ष), रा. बजाजनगर याच्या उजव्या मांडीमध्ये गोळी लागून तो जखमी झाला. त्याला अझहर शफी सय्यद (४० वर्ष), रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) याने घाटी रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला अझहर शफी याने अपघातात महेश पवार जखमी झाल्याचे सांगितले. दरम्यान, महेश पवार यांनी जबाब दिल्यानंतर पोलिसांनी अजहर शफी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, शिवराई फाटा येथील सपना हॉटेलशेजारील मोकळ्या जागेत पिस्तूल हाताळताना त्याच्याकडून गोळी सुटल्याचे त्याने कबूल केले. वाळूज पोलिसांनी आरोपी अजहर शफी याच्या पडेगाव येथील घराची झडती घेतली असता ड्रममध्ये 30 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, तीन हजार रुपये किंमतीची तीन जिवंत काडतुसे असा ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी आरोपी अजहर शफी सय्यद याला अटक करीत त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक अजय शितोळे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top