महायुतीचा डंका! 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांचा निकाल जाहीर : सात जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा 

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडले होते. 9 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. महानगर पालिकांच्या निकालाप्रमाणेच या निवडणुकीतही महायुतीचाच डंका दिसून आला आहे. 

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडले होते. 9 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. महानगर पालिकांच्या निकालाप्रमाणेच या निवडणुकीतही महायुतीचाच डंका दिसून आला आहे. 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व दिवंगत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 2 जिल्हा परिषदांवर समाधान मानावे लागले. विरोधी बाकावरील महाविकास आघाडीला अवघी एक जिल्हा परिषद मिळाली आहे.

राज्यातील 12 पैकी 7 जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. यात सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा आणि सोलापूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्हा परिषदांवर भगवा फडकवला आहे. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने शानदार विजय मिळवला आहे. सांगलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

कोणत्या पक्षाने किती जिल्हा परिषदा जिंकल्या?

भाजप : सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा, सोलापूर.

शिवसेना एकनाथ शिंदे  : रायगड, रत्नागिरी

राष्ट्रवादी : पुणे, कोल्हापूर

राष्ट्रवादी शरद पवार : सांगली

पक्ष –   जिल्हा परिषद (12). – पंचायत समिती (125)

भाजप. –       7.          –        48

शिवसेना  –      2.           –      26

राष्ट्रवादी  –       2.           –     23

काँग्रेस.    –      0             –     8

राष्ट्रवादी (शरद पवार) –  1.   –   8

शिवसेना (ठाकरे गट)  –  0    –   5

इतर         –       0             – 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »