dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

नानेगाव येथील मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराला धक्काबुक्की 

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील अंभई गटात मतदान प्रक्रिया शनिवार,  सात फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर नानेगाव येथे भाजपचे उमेदवार त्र्यंबक गव्हाणे बुथवर गेल्यानंतर त्यांना तेथील नागरिकांनी विरोध करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.

या गटातून माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा अमेर सत्तार निवडणूक लढवत आहे.

आमदार अब्दुल सत्तार साठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे. त्यामुळे सिल्लोड तालुक्यातील खेड्यापाड्यात थेट भाजप विरुद्ध शिवसेना लढत होत आहे. यावेळी काही नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यासोबतही वाद घालून काही वेळ गोंधळ निर्माण केला होता. पोलिसांची अधिक कुमक मागून मतदान केंद्रात जमा झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांना आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top