dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

टी-२० विश्वचषक : श्रीलंकेचा सलग दुसऱ्या सामन्यात विजय | प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ओमानचा १०५ धावांनी पराभव  

कॅंडी : श्रीलंकेच्या संघाने टी-२० विश्वचषकात सलग दुसरा सामना जिंकला आहे. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात संघाने ओमानचा १०५ धावांनी पराभव केला. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या ग्रुप बी सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने २० षटकांत ५ बाद २२५ धावा केल्या.

उत्तरात ओमान २० षटकांत ९ बाद १२० धावाच करू शकला. मोहम्मद नदीमने ५३ धावा केल्या. वसीम अलीने २७ धावा केल्या. दुष्मंथा चामीरा आणि महेश थीकशनाने प्रत्येकी दोन बळी घेतले. दुनिथ वेल्लालागे, दुष्मंथा आणि कामिंदू मेंडिसने प्रत्येकी एक बळी घेतला. विनायक शुक्ला आणि सुफियान महमूद धावबाद झाले. ओमानकडून जितेन रामानंदीने दोन विकेट्स घेतल्या. जय ओडेदरा आणि सुफियान महमूद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. कुसल मेंडिस धावबाद झाला.

शनाकाचे सर्वात जलद अर्धशतक  

श्रीलंकेकडून कुसल मेंडिस (६१), पवन रत्नायके (६०) आणि दासुन शनाका (५०) यांनी अर्धशतके केली. शनाकाने १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि तो टी२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा श्रीलंकेचा खेळाडू ठरला.

श्रीलंका संघ : दासून शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कामिल मिश्रा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), पवन रत्नायके, कामिंदू मेंडिस, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, दुष्मंथा चमीरा, महेश थेक्षाना, आणि मथिश पाथिराना.

ओमान संघ : जतिंदर सिंग (कर्णधार), आमिर कलीम, हम्माद मिर्झा, वसीम अली, मोहम्मद नदीम, जितेन रामानंदी, विनायक शुक्ला (यष्टीरक्षक), सुफयान महमूद, नदीम खान, शाह फैसल आणि जय ओडेदरा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top