Shivani Kachole : कन्नड तालुक्यातील जवखेडा खुर्द गावातील शिवानी काचोळे यांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली आहे. जवखेडा खुर्द गावातील एकमेव महिला पोलिस म्हणून निवड झालेल्या शिवानी काचोळे यांचा नुकताच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नाचनवेल : कन्नड तालुक्यातील जवखेडा खुर्द गावातील शिवानी काचोळे यांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली आहे. जवखेडा खुर्द गावातील एकमेव महिला पोलिस म्हणून निवड झालेल्या शिवानी काचोळे यांचा नुकताच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जवखेडा खुर्द येथील रहिवासी असलेल्या शिवानी काचोळे यांनी आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर आणि चिकाटीवर जळगाव पोलिस दलात निवडीचा बहुमान मिळवला आहे. शिवानी काचोळे यांनी आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर मिळवलेल्या यशाचे गावात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलिस दलात निवड झालेल्या शिवानी काचोळे यांचा नुकताच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कौशल्या काचोळे, ज्ञानेश्वर काचोळे, काशीनाथ काचोळे, जवखेडा खुर्द गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. दरम्यान, आत्मविश्वासाच्या बळावर आपली स्वप्ने साकार करता येतात, त्यामुळे युवकांनी कायम सकारात्मक राहून यशाचा पाठलाग करावा असे आवाहन शिवानी काचोळे यांनी केले आहे.


