dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शिवसेना (उबाठा)  जिल्हाप्रमुखांची लेक राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नववी

बुलढाणा: हल्ली लोकप्रतिनिधी, नेत्यांची पाल्य वारसा जोपासत राजकारणात सक्रीय होताना दिसून येतात. मात्र, शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुखांच्या कन्येने स्वकर्तुत्वाने आपले वेगळे अस्तित्व निर्माण करत नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. 

बुलढाणा: हल्ली लोकप्रतिनिधी, नेत्यांची पाल्य वारसा जोपासत राजकारणात सक्रीय होताना दिसून येतात. मात्र, शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुखांच्या कन्येने स्वकर्तुत्वाने आपले वेगळे अस्तित्व निर्माण करत नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. नुकताच, राज्य लोकसेवा आयोगाच्या गट क संवर्गातील परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये, शीतल जालिंदर बुधवत हिने दैदिप्यमान कामगिरी करत मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे. खुल्या महिला प्रवर्गातून शीतल राज्यातून नवव्या स्थानी आहे. मंत्रालयात कर सहाय्यक पदावर तिची निवड झाली असून, राजकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रातून शितलचे कौतुक होत आहे.

  गेल्या अनेक दशकांपासून जालिंदर बुधवत हे शिवसेनेत आहेत. निष्ठावंत शिवसैनिक आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे. असे असतानाही आपल्या मुलांना राजकारणाचा स्पर्श होऊ न देता त्यांनी सुरुवातीपासूनच शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे. परिणामी, मुलं ही उच्चशिक्षित झाली.  यामध्येच, सातत्यपूर्ण परिश्रमाने  लाडकी लेक शीतल हिने कर सहाय्यक पदाला गवसणी घातली. शीतलने माध्यमिक शिक्षण बुलढाण्यातील भारत विद्यालयात पूर्ण केल्यानंतर पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीए (इंग्रजी) पदवीसाठी प्रवेश घेतला होता. पदव्युत्तर शिक्षणानंतर  राज्य शासनाच्या सेवेचा निश्चय तिने व्यक्त केला. त्यानुसार, पुणे येथेच तयारी सुरू केली, आपल्या सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर याआधी शितलने नागपूर महानगरपालिका  कर सहाय्यक पद प्राप्त केले होते. आता मंत्रालयात  कर सहाय्यक म्हणून तिची निवड झाली हे विशेष! तिच्या या यशाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top