Ram Navami Festival: रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथे देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी माता जगदंबा, संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज आणि संत रामराव बापू यांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.

मानोरा : रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथे देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी माता जगदंबा, संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज आणि संत रामराव बापू यांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. याच पार्श्वभूमीवर संत बाबनलाल महाराज मंदिरात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या हस्ते होमपूजा पार पडली. यावेळी पुजारी सुनील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी संपन्न झाले तसेच भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
दरम्यान, बंजारा समाजाच्या परंपरेनुसार रामेश्वर नाईक यांचा मान-सन्मान करण्यात आला. त्यांच्या हस्ते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमास अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामनवमीच्या दिवशी रामेश्वर नाईक यांनी पोहरादेवी गडावरील विविध पवित्र स्थळांना भेट देत माता जगदंबा, संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज आणि संत रामराव बापू यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले.


