मुंबई : ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात आता खऱ्या अर्थाने ठिणगी पडणार आहे, कारण पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून खुद्द राखीने सावंत घरात एन्ट्री घेतली आहे. जिच्याशिवाय ‘बिग बॉस’चा कोणताही सिझन पूर्ण होऊ शकत नाही, ती ‘ड्रामा क्वीन’ आता पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. वाहिनीने याचा अधिकृत धमाका केला असून, राखीच्या येण्याने घरातील समीकरणे आता पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळणार, हे स्पष्ट झाले आहे.

आपल्या एन्ट्रीबद्दल बोलताना राखीने नेहमीच्या बेधडक अंदाजात सांगितले की, “राखी येणार आणि गेम पूर्ण पालटणार! माझ्याशिवाय बिग बॉस अधुरे आहे, हे जगाला माहितीये. मी घरात गेले की सगळ्यांचा आवाज आपोआप गायब होतो. तिथे फक्त राखीची मर्जी चालणार. माझे अतरंगी कपडे, माझा गेम आणि माझी धम्माल पाहण्यासाठी तयार राहा.” राखीने घरात एन्ट्री करताना संपूर्ण सोनेरी रंगाचा गाऊन आणि डोक्यावर नागिन मुकुट घातला होता. इतकेच नाही, तर तिच्या हातात एक पुंगीही होती.
घरात येताच तिने तन्वी कोल्तेची शाळा घेतली. राखीने तन्वीचा उल्लेख तन्वी कोळसे असा केला. त्यावर तन्वीने तिचे आडनाव कोल्ते असल्याचे सांगितले. यावर राखीने तिला उत्तर दिले, “आता मी तुला चांगलंच सोलते.” राखीचे उत्तर ऐकून तिथे एकच हशा पिकला. आतापर्यंत घरातील स्पर्धकांमध्ये जी काही रस्सीखेच सुरू होती, तिथे आता राखी सावंत स्वतःचे नियम लावणार आहे. राखीच्या येण्याने घराचे तापमान वाढणार असून प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे.