dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालन्यात ‘पेट्रोल स्ट्राईक’सदृश्य परिस्थिती; पंप बंद, वाहनधारकांची धावपळ | ‘Petrol Strike’-like Situation in Jalna

Petrol Strike’-like Situation in Jalna : Narendra Modi यांनी संसदेत इंधन परिस्थितीवर भाष्य केल्यानंतर लगेचच शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

रामनवमीच्या पूर्वसंध्येला इंधन टंचाईचा फटका; प्रशासनाचे नियोजन ठप्प

विनोद काळे | जालना : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीचे पडसाद जालना शहरात उमटताना दिसत असून, बुधवारी अचानक इंधन टंचाईसारखी परिस्थिती निर्माण झाली. Narendra Modi यांनी संसदेत इंधन परिस्थितीवर भाष्य केल्यानंतर लगेचच शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

सायंकाळपर्यंत अनेक पंप चालकांनी पंप बंद केल्याने नागरिकांमध्ये गोंधळ आणि चिंतेचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे, दुसऱ्याच दिवशी रामनवमीची शासकीय सुटी असल्याने इंधन पुरवठा सुरळीत होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली, तर काहींना रिकाम्या हाताने परत जावे लागले. यामुळे शहरात ‘पेट्रोल स्ट्राईक’ सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली. प्रशासनाकडून ठोस भूमिका न आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे चित्र आहे.

एकूणच, अचानक उद्भवलेल्या या टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असून, नियोजनाअभावी प्रशासनावर टीका होत आहे.

आम्ही आढावा घेत आहोत

“सध्याच्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेत आहोत. पेट्रोल पंप चालक व पुरवठादार एजन्सींच्या म्हणण्यानुसार ‘लोड’ उशिरा येत असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. इंधन टंचाईबाबत लवकरच स्पष्ट माहिती देण्यात येईल.”

» सविता चौधर,

जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top