dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पहिल्याच दिवशी विज्ञान कुतूहल प्रदर्शन हाऊसफुल्ल!

वाशिम :विज्ञान, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम ठरणाऱ्या कुतूहल विज्ञान प्रदर्शनीला ६ फेब्रुवारी रोजी उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थी प्रदर्शनी पाहण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम येथे दाखल झाले. विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण परिसरात रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पोलिस प्रशासन व आयोजन समितीच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना रांगेतून प्रवेश देण्यात येत होता. मात्र गर्दी अधिक झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शरीररचना, वैज्ञानिक प्रयोग तसेच आरोग्यविषयक सविस्तर माहिती समजावून घेता आली नाही. परिणामी बहुतांश विद्यार्थ्यांनी केवळ प्रदर्शनीत ठेवलेली चित्रे, प्रयोगांचे मॉडेल्स आणि शरीराचे विविध अवयव दर्शविणारी दृश्ये पाहून समाधान मानले.

तरीही विज्ञानाबद्दलची उत्सुकता, नव्या गोष्टी जाणून घेण्याची ओढ आणि प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे चित्र दिसून आले. पुढील दिवसांत गर्दीचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती मिळावी, अशी अपेक्षा पालक व शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top