नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, शिंदेसेनेचा वरचश्मा: भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा एक जागेवर विजय

छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि एका नगर पालिका निवडणुकीचा निकाल रविवार, 21 डिसेंबर रोजी लागला. या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना (शिंदेगट) पक्षाचे प्रत्येकी दोन नगराध्यक्ष निवडून आले. तर शिवसेना (उबाठा), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रत्येकी एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला.

कन्नडमधून काँग्रेसचे फरीन बेगम जावेद सेठ, खुलताबादमधून आमेर पटेल हे उमेदवार विजयी झाले. तर सिल्लोडमधून शिवसेना (शिंदेगट) अब्दुल समीर अब्दुल सत्तार, पैठणमध्ये विद्या कावसानकर, फुलंब्रीमध्ये शिवसेनेचे (उबाठा) राजेंद्र ठोंबरे, वैजापूरमध्ये भाजपचे डॉ. दिनेश परदेशी, गंगापुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे संजय जाधव हे उमेदवार विजयी झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीतील सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सिल्लोड आणि पैठणमध्ये शिवसेनेच्या (शिंदेगट) आमदारांना आपली प्रतिष्ठा राखता आली. तर गंगापूर, खुलताबाद, फुलंब्रीमध्ये भाजपच्या विद्यमान आमदारांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारांनी धक्का दिला. कन्नडमध्ये शिवसेना (शिंदेगट) पक्षाच्या आमदारांना काँग्रेसच्या उमेवारांनी पराभवाचा धक्का दिला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी निकालानंतर गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »