अकोलादेव : आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी लढावे लागले, कारण आता आम्हाला सांगावे लागले की, अब तो हिंदू ही आगे है. हा नारा आता अजून बुलंद करण्याची वेळ आली असून या पुढे हिंदुनी जास्त संख्येने एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बजरंग दलाचे राष्ट्रीय नेते डॉ.प्रवीण तोगडिया यांनी रविवार, 12 एप्रिल रोजी टेंभूर्णी येथे संघटनेच्या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिरास मार्गदर्शन करतांना केले.

आपल्याला घरा-घरात हनुमान चालीसा पठण करणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगून, मी काल डॉक्टर मंडळींची भेट घेऊन हिंदूना जमल्यास मोफत उपचार देण्याची विनंती केली असल्याचे सांगितले. बेरोजगारी कमी करण्याची गरज असून त्या साठी पुढे यावे लागेल. सर्वांच्या हाताला काम भेटण्याची गरज आहे. आम्ही प्रत्येक हाताला रोजगार देण्याचे काम देण्यास सुरवात केली आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा लागेल. आम्हाला दान नको, पण आमच्या शेती मालाला भाव द्या, भारताच्या प्रत्येक गावात हनुमान चालीसा पठणासाठी आम्ही प्रयत्नशील असून सगळ्या गावा गावात हे सुरू करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी राष्ट्रीय बजरंग दलाच्या माध्यमातून पुढे होण्याची गरज आहे. सगळे हिंदू संघटित करण्यासाठी वाटलेला हिंदू एकत्र करण्याची अजूनही गरज आहे. सर्वात आधी आम्ही हिंदू आहोत, अशी गर्जाना करत त्यांनी उपस्थितांमध्ये जोश निर्माण केला. देशात मुस्लिम लोकसंख्या वाढत असून, आता तीन बच्चे हिंदू सच्चे, अशी बोलण्याची वेळ आली आहे. भारतात हिंदू घटला असून तो वाढला पाहिजे असे सांगून हिंदू ही जितेंगा असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी डॉ. तोगडिया यांच्या उपस्थितीत टेंभुर्णीमध्ये सामूहिक हनुमान चालीस पठण सुरू करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला. आपले घर सुरक्षित करून एकत्र राहण्यासाठी हनुमान चालीसा सुरू करणे असून जसे पक्के राम मंदिर रामाला भेटले, तसे सगळ्या हिंदूला पक्के घर भेटले पाहिजे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. टेंभुर्णी येथील दत्त मंदिर परीसरातील मोठ्या डोममध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तालुक्यासह अन्य ठिकाणाहून कार्यकर्ते आले होते.