मेडिकल संचालकाला मारहाण, हप्त्याची मागणी, कापून टाकण्याची धमकी! धाडमध्ये खळबळ.. 

धाड :  हप्त्याची मागणी करून चार जणांनी मेडिकल संचालकाला  कापून टाकण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना ६ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास धाड येथे  घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 

संजय गावंडे/धाड :  हप्त्याची मागणी करून चार जणांनी मेडिकल संचालकाला  कापून टाकण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना ६ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास धाड येथे  घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 

पवन राजेंद्र सोनुने (वय ३०)  असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सोनूने हे दुधा  रहिवासी असून धाड येथे जनावरांच्या औषधीचे मेडिकल दुकान आहे. ६ फेब्रुवारी  रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनुने  मेडिकलकडे जात होते. यावेळी आरोपी अक्षय जीवनलाल बिलंगे (वय २३), रोशन गणेश शिंदे (वय २२), राहुल विजय दळवी (वय २४) व एका अनोळखी तरुणाने पवन सोनुने यांना जगदंबा स्वीट मार्ट बिकानेरसमोर अडविले.

आरोपी अक्षय बिलंगे याने अश्लील शिवीगाळ करून  ‘तुला गावात राहायचे असेल आणि धंदा करायचा असेल, तर आम्हाला महिन्याला हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी केली. नाही तर तुला गावात धंदा करू देणार नाही, अशा धमक्या देत आरोपींनी पवन यांना हातातील कड्याने  तोंडावर व ओठावर  मारहाण करून जखमी केले. घटनेनंतर पवन सोनुने तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जात असताना आरोपींनी त्यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर गाठले. तक्रार दिल्यास तुला दुधा ते धाड रस्त्यावर  कापून टाकू. कोणालाही काही माहिती होणार नाही, अशा धमक्या दिल्या.

 तक्रारीवरून चार जणांविरुद्ध बीएएनएस कलम ११८ (१), २९६, ११५, ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »