dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

डावे पक्षाने खामगावात जाळला अमेरिकेचा कापूस, सोयाबीन आणि मका | केंद्र सरकारने अंमलात आणलेले कामगार कायद्यांची सुद्धा केली होळी

खामगाव :  देशातील प्रमुख कामगार संघटना व शेतकरी संघटने कडून 12 फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला खामगाव येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तसेच यावेळी भारतीय किसान सभे कडून भारत सरकारकडून अमेरिकाकडून आयात केलेला कापूस, सोयाबीन मका यांची होळी करण्यात आली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन एसडीओंच्या मार्फत राष्ट्रपतींना दिले.

खामगाव :  देशातील प्रमुख कामगार संघटना व शेतकरी संघटने कडून 12 फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला खामगाव येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तसेच यावेळी भारतीय किसान सभे कडून भारत सरकारकडून अमेरिकाकडून आयात केलेला कापूस, सोयाबीन मका यांची होळी करण्यात आली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन एसडीओंच्या मार्फत राष्ट्रपतींना दिले.

यावेळी अखिल भारतीय किसान सभा कडून दिलेल्या निवेदनात केंद्र शासनाने अंमलात आणलेले कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करण्याची मागणी केली तसेच भारत-अमेरिका व्यापार करार तातडीने थांबवावा. अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथून आयात केलेला कापूस, सोयाबीन, मका याची होळी करून तात्काळ ही आयात थांबविण्याची मागणी केली. तसेच वीज दुरुस्ती बिल योग्य द्यावेत, ज्यादा बिल लादणे बंद करावे, पूर्वीचा रोजगार हमी कायदा पुन्हा लागू करावा व त्यामध्ये अधिक मजूर हिताचे परावधान करावे, योजना कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा, बिर्ला कॉर्पोरेट कामगारांचे सर्व क्लेम मंजूर करून द्यावे तसेच बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावा, ईपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन द्यावे, रेशन कार्ड धारकाचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले तात्काळ देण्यात यावे. वनअधिकार कायद्याची कडक अंमलबजावणी करून शेतकर्यांना न्याय देण्यात यावा, शेती माला करिता एम.एस.पी. लागू करा व शेतकरी हिताचा डॉ. स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा व शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई व पिक विमा त्यांचा बँक खात्यात जमा करा. आदी मागण्यांचे निवेदन यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले आहे. निवेदनावर कॉ. शैलेश तायडे सचिव, एम.एस.ई वर्कस फेडरेशन, कॉ. एन.वाय. देशमुख सरचिटनिस विज उद्येोगातील कंत्राटी व बाह्यस्त्रोत कामगार संघटना, कॉ. विप्लव कवीश्वर जिल्हा सदस्य मा क.प. बुलढाणा, कॉ. रमेश अजेडीवाल कोषाध्यक्ष बिर्ला कोटसीन खामगाव, कॉ. वाय.एम. वानखडे किसान आघाडी माकप, कॉ. एस.ए. जाधव, कॉ. दगुड मोरे, कॉ. जितेंद्रकुमार चोपडे जिल्हाध्यक्ष अ. भा. किसान सभा बुलढाणा, कॉ. महेश वाकदकर, कॉ. आदित्य इदावते जिल्हा सचिव एस. एफ.आय बुलढाणा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top