dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सुरू होण्याआधीच जालना येथील  ‘ड्रायपोर्ट’ ला लागले ‘सील’ | Jalna’s ‘Dry Port’ Sealed

Jalna’s ‘Dry Port’ Sealed : देशातील पहिला ड्रायपोर्ट प्रकल्प म्हणून ओळखण्यात येणारा जालना येथील एमएमएलपी अर्थात मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कला सुरू होण्याआधीच टाळे लागले आहे.

जालना :  देशातील पहिला ड्रायपोर्ट प्रकल्प म्हणून ओळखण्यात येणारा जालना येथील एमएमएलपी अर्थात मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कला सुरू होण्याआधीच टाळे लागले आहे. शासनाचा 52 लाखांचा जमीन महसूल थकवल्याप्रकरणी जालना तहसील कार्यालयाने या प्रकल्पाला सील ठोकले आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

जालन्यातील दरेगाव शिवारात सुमारे 495 एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडून जमीन महसुलाची थकबाकी दीर्घकाळ प्रलंबित होती. महसूल विभागाकडून वारंवार सूचना देऊनही संबंधित प्राधिकरणाने थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर तहसील प्रशासनाने कठोर पाऊल उचलले. तहसीलदार छाया पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन प्रकल्पाला सील ठोकले.

विशेष म्हणजे, हा प्रकल्प सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच अशी कारवाई झाल्याने प्राधिकरणावर नामुष्की ओढवली आहे. थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरल्यानंतरच सील काढण्यात येईल, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जालना ड्रायपोर्ट हा केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेला प्रकल्प आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट  आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट यांच्या सहकार्याने विशेष उद्देश कंपनीमार्फत  हा मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात आला आहे. अलीकडेच विकास कोल अँड मिनरल्स प्रा. लिमिटेड या कंपनीला पुढील 15 वर्षांसाठी संचालनाची जबाबदारी देण्यात आली असून, लवकरच येथे कंटेनर यार्ड, वेअरहाऊस, ट्रक टर्मिनससह विविध सुविधा सुरू होण्याची अपेक्षा होती.

धनादेशाद्वारे महसूल जमा करणार

ड्रायपोर्ट प्राधिकरणाकडे शासनाचा 52 लाखांचा जमीन महसूल थकित आहे. त्यामुळे महसूल पथकाने हा प्रकल्प सील केला. दरम्यान, प्राधिकरणाच्या वतीने सोमवार, 30 मार्च रोजी धनादेशाद्वारे महसूल जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

» छाया पवार, तहसीलदार, जालना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top