dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भारतीय सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळले | 10 जवान शहीद : जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाचा अपघात

श्रीनगर :  जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील भादरवाह भागात भारतीय सैन्याचे वाहन 4०० फूट दरीत कोसळून १० जवान शहीद झाले आहेत. या अपघातात अनेक जवान जखमी देखील झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ जवानांना घेऊन जाणारी भारतीय लष्कराची बुलेट प्रुफ गाडी ही उंचावरील पोस्टकडे चालली होती. त्यावेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खोल दरीत कोसळळी.

या दुर्घटनेची माहिती मिळताच लष्कराची आणि पोलिसांच्या टीमने त्वरित मदत कार्य सुरू केले. स्थानिक लोकांनी देखील पोलीस आणि रेस्क्यू टीमला मदत केली. बचाव कार्यादरम्यान, १० जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच जखमींना देखील बाहेर काढण्यात आले. त्यांना गंभीर स्थितीत रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हेलिकॉप्टरमधून उधमपूरच्या कमांड रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत. लष्कराने दिलेल्या वक्तव्यानुसार या अपघाताची चौकशी सुरू केली असून जखमी जवानांना सर्वोत्तम उपचार देण्यात येत आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवनांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

संपूर्ण देश शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी : उपराज्यपाल

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, या अपघातामुळे मी दुःखी आहे. या कठीण प्रसंगी, संपूर्ण देश शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी एकजुटीने आणि समर्थनाने उभा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तम उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top