dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गुलाबराव पाटील कोलते यांचा सर्कल दौरा

सावळदबारा :  आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी सर्कल दौरा मंगळवार, 27 जानेवारी रोजी सुरु केला आहे. त्यांनी फर्दापूर व सावळदबारा येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेवून निवडणूक तयारीचा त्यांच्याकडून आढावा घेतला.

जिल्हा परिषदेसाठी सोयगाव तालुक्यातील फर्दापूर गटातून भाजपचे माहीन इद्रिस मुलतानी तर सावळदबारा पंचायत समिती गणातून उत्तम चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते, ताराचंद जाधव, रामचंद्र चिमणकर यांनी सर्कल दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यादरम्यान ते फर्दापूर आणि सावळदबारा सर्कलमधील विविध गावांना भेटी देऊन तेथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांचया भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी गुलाबराव पाटील कोलते यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत निवडणुकीच्या रणनितीविषयी चर्चा केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top