dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अखेर काँग्रेसने उमेदवार दिलाच : बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीविरोधात काँग्रेस | Baramati Assembly by-election

Baramati Assembly by-election : अखेर काँग्रेसकडून बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. 

बारामती : अखेर काँग्रेसकडून बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उमेदारासंदर्भात रविवारी काँग्रेसकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती. या विधानसभेच्या जागेवर आता पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना आकाश मोरे यांचे आव्हान असणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होता, मात्र काँग्रेसने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता ही निवडणूक महायुतीविरोधात काँग्रेस अशी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top