dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक; वाशिम–रिसोड मार्ग रोखला | Washim-Risod road blocked

Washim-Risod road blocked : आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या अडोळी गावाने ‘गाव विक्री’चा टोकाचा निर्णय घेतल्यानंतर आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. सोमवार, ६ एप्रिल रोजी ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ग्रामस्थांनी अडोळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत वाशिम–रिसोड मार्ग काही काळासाठी ठप्प केला. त्यामुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

‘आता आरपारची लढाई’; अडोळीकरांचा सरकारला थेट इशारा

अडोळी   : आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या अडोळी गावाने ‘गाव विक्री’चा टोकाचा निर्णय घेतल्यानंतर आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. सोमवार, ६ एप्रिल रोजी ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ग्रामस्थांनी अडोळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत वाशिम–रिसोड मार्ग काही काळासाठी ठप्प केला. त्यामुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

गेल्या २ एप्रिलपासून अडोळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी हा आक्रमक पवित्रा घेतला. तहसीलदारांसह विविध अधिकारी आणि खासदारांनी गावाला भेट दिली असली तरी, ‘राज्य शासनातील जबाबदार प्रतिनिधी येऊन आमच्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,’ असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रस्ता रोकोदरम्यान शेतकऱ्यांनी ‘सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे’, ‘घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा जोरदार घोषणा देत शासनाविरोधात संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे वाशिम–रिसोड मार्गावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.  या आंदोलनात युवा शेतकरी सतीश इढोळे, बालाजी मोरे, सोनुताई मुळे, प्रविण मते, नामदेव पतंगे, बालाजी पडेल, मनोहर सावके, शांतीराम भालके, राजेंद्र खोलगाडे, समाजसेवक राजकुमार पडघान, दौलत पडघान, रामेश्वर खंडारे, शाळीग्राम इढोळे, भागवत इढोळे, वसंतराव इढोळे, गजानन इढोळे यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  अडोळी गावाचा हा लढा आता केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या व्यापक प्रश्नांचे प्रतीक बनत चालला असून, शासन या आंदोलनाची दखल कशी घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top