dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

चिखली – माहूर शिवशाही बसचे ब्रेक फेल, अनर्थ टळला | Chikhli– Mahur Shivshahi Bus Brakes Fail

Chikhli–Mahur Shivshahi Bus Brakes Fail : चिखली येथील बस आगारातून मेहकरकडे निघालेल्या शिवशाही बसचे ब्रेक  लव्हाळा फाट्यावर अचानक फेल झाले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला या बसमधून 40 प्रवासी प्रवास करीत होते.ही घटना 30 मार्च रोजी दुपारी 1 वाजता घडली.

चिखली :  येथील बस आगारातून मेहकरकडे निघालेल्या शिवशाही बसचे ब्रेक  लव्हाळा फाट्यावर अचानक फेल झाले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला या बसमधून 40 प्रवासी प्रवास करीत होते.ही घटना 30 मार्च रोजी दुपारी 1 वाजता घडली.

 चिखली आगाराची चिखली  माहूर बस क्रमांक एम एच इ एम 1713 ही वातानुकूलित शिवशाही बस दुपारी सुमारे 12.30 वाजता चिखली येथून प्रवाशांना घेऊन निघाली होती. दरम्यान लव्हाळा फाटा येथे काही प्रवाशांना उतरुन दिल्यानंतर थोड्याच अंतरावर चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला मात्र कोणताच ब्रेक लागले नाही. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने चालकाने शिताफीने बस नियंत्रित करून रस्त्याच्या बाजूला उभी केली. बस थोडीजरी वेगात असती किंवा गर्दीत असती तर फार मोठा अनर्थ घडला असता.

भंगार  बसेस रस्त्यावर नको 

यापूर्वी शिवशाही बसेस संदर्भात अशा अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे अशा बसेस रस्त्यावर आगारात जमा कराव्या 

छाया वाकळे, वाशिम, प्रवासी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top