Chhatrapati Sambhajinagar Crime News :छत्रपती संभाजीनगरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून 

Chhatrapati Sambhajinagar Crime News :पूर्ववैमनस्यातून एका 32 वर्षीय तरुणास क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करीत त्याचा खून करण्यात आल्याची घटना सोमवार, 2 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. 

छत्रपती संभाजीनगर : पूर्ववैमनस्यातून एका 32 वर्षीय तरुणास क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करीत त्याचा खून करण्यात आल्याची घटना सोमवार, 2 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. ही घटना हर्सूल परिसरातील चेतनानगर भागात घडली असून दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (32), रा. चेतनानगर, हर्सूल असे मयत तरुणाचे नाव असल्याची माहिती बेगमपूरा पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मयत दिनेश उर्फ बबलू मोरे च्या नातेवाईकांनी घाटी रग्णालयात धाव घेत एकच टाहो फोडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात तीन ते चार जणांनी दिनेश उर्फ बबलू मोरे याला हर्सूल परिसरातील चेतनानगर येथे असलेल्या मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळण्याच्या बॅटने बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी होवून दिनेश उर्फ बबलू मोरे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हा प्रकार परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेची माहिती पेालिसांना दिली. बेगमपुरा आणि हर्सूल पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिनेश उर्फ बबलू मोरे याला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी घाटी रग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना दिनेश उर्फ बबलू मोरे याला मारहाण करण्यासाठी वापरलेली क्रिकेटची बॅट मिळून आली. रात्री उशिरापर्यंत दिनेश उर्फ बबलू मोरे याची हत्या कोणी व कशासाठी केली याचे कारण समजू न शकल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »