dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भाजपच्या विजयाचा सावळदबारा येथे जल्लोष

सावळदबारा : भारतीय जनता पक्षाचे फर्दापूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार माहीन इद्रिस मुलतानी, सावळदबारा पंचायत समिती गणाचे उमेदवार उत्तम चव्हाण, फर्दापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार राहुल राठोड विजयी झाले आहेत. तसेच राज्यातील बारा पैकी आठ जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची निर्विवाद सत्ता आल्याबद्ल सावळदबारा येथे भाजपच्या वतीने सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी जल्लोष करण्यात आला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत सोयगाव तालुक्यातील फर्दापूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार माहीन इद्रिस मुलतानी, सावळदबारा पंचायत समिती गणाचे उमेदवार उत्तम चव्हाण, फर्दापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार राहुल राठोड विजयी झाले. तसेच राज्यातील बारा पैकी आठ जिल्हा परिषदेस भारतीय जनता पक्षाची निर्विवाद सत्ता आल्याचे जाहीर होताच भारतीय जनता पक्षाचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते, रामाचंद्र चिमणकर, गजानन दांडगे, रमेश कपाटे आदींसह भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याानी एकमेकांना मिठाई भरवत, फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष केला. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top