dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

रिसोडमध्ये एसआयआर मॅपिंगदरम्यान बीएलओला बेदम मारहाण | BLO brutally beaten during SIR 

BLO brutally beaten during SIR : रिसोड शहरात एसआयआर  मॅपिंगचे काम करत असताना एका बीएलओला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

रिसोड  :  शहरात एसआयआर  मॅपिंगचे काम करत असताना एका बीएलओला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवनाथ पांडुरंग बोंडे (वय ४३) असे जखमी बीएलओचे नाव असून त्यांना तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारासाठी त्यांना वाशिम येथे हलविण्यात आले आहे. घटनेनंतर एसआयआर  मॅपिंगचे काम करणाऱ्या बीएलओ कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top