dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर विराजमान; 115 पैकी मिळाली ७० मते 

छत्रपती संभाजीनगर :  भारतीय जनता पार्टीचे समीर राजूरकर हे छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या महापौरपदी मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी विराजमान झाले.  महापौर पदाच्या निवडणुकीत त्यांना 115 मतांपैकी 70 मते मिळाली,  तर एम आय एम चे उमेदवार अशोक हिवराळे यांना 33 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने तटस्थ भूमिका घेतली होती.

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तब्बल 57 जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिंदे गटाने 13 जागा मिळवल्या होत्या. निवडणुकीपूर्वी स्वबळावर लढणारे भाजप शिंदे सेना हे या दोन्ही पक्षांनी युती केल्याने महापौरपदी भाजपचे उमेदवार विजयी होणार हे निश्चित होते. भारतीय जनता युवा मोर्चा पासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे समीर राजूरकर यांना भाजपने महापौर पदाची संधी दिली होती, तर शिंदे गटाने माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौर पदाची उमेदवारी दिली होती. मंगळवारी झालेल्या महापौराणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार समीर राजूरकर यांना सत्तर मते मिळाली तर उपमहापौर पदाचे उमेदवार राजेंद्र जंजाळ यांना देखील सत्तर मते मिळाली. ही निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी एमआयएम ने महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार दिले होते. परंतु या दोन्ही उमेदवारांना 33 मतांवर समाधान मानावे लागले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top