dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सावळदबारा येथे भाजपचा स्थापना दिवस उत्साहात | BJP’s foundation day 

BJP’s foundation day  :  भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सावळदबारा येथे रविवार, 5 एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

सावळदबारा :  भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सावळदबारा येथे रविवार, 5 एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस रविवारी सावळदबारा येथे साजरा करण्यात आला. यावेळी सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भारतीय जनता पक्षाची ध्येय, धोरणे समजावून सांगितली. तसेच भाजपचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळापर्यंत जावून पक्षाचा प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन केले. यावेळी गुलाबराव पाटील कोलते यांच्या हस्ते उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले. यावेळी एकनाथ सपाटे, ताराचंद जाधव, राजू दांडगे, मुरली पाटील, दिलीप पुजारी, नरेश देशमुख, रमेश कपाटे, शंकर अवसरमोल, योगेश साळुंके आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top