अभियंत्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; घटना सीसी कॅमेऱ्यात कैद ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भोकरदन : दिलेली तक्रार मागे घे, अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत जाळून टाकू, अशी धमकी देत एका अभियंत्याच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावल्याची धक्कादायक घटना भोकरदन येथे घडली. हा प्रकार सीसीकॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

भोकरदन : दिलेली तक्रार मागे घे, अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत जाळून टाकू, अशी धमकी देत एका अभियंत्याच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावल्याची धक्कादायक घटना भोकरदन येथे घडली. हा प्रकार सीसीकॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेख तालेब शेख रऊफ रा. नाकोडानगर, भोकरदन यांनी तक्रार दिली आहे की, शेख हे व्यवसायाने अभियंता असून ते आपल्या कुटुंबासह शहरात राहतात. मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी काही कामानिमित्त ते मध्य प्रदेशात गेले होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना फोन करून माहिती दिली की, त्यांच्या घराच्या बाहेरील भागाला आग लागली आहे. घरी परतल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, १० फेब्रुवारीच्या पहाटे १.५४ वाजता दोन इसम बुलेटवरून तिथे आल्याचे दिसले. त्यातील अनिल गावंडे या ओळखीच्या व्यक्तीने घराच्या समोरील भागावर कॅनमधून पेट्रोल ओतले आणि आग लावून दिली. या आगीत घरासमोरील झाडांच्या कुंड्या, पायपुसणी आणि चपला जळून नुकसान झाले आहे. या वादाची मुळे जुन्या आर्थिक फसवणुकीत आहेत. संशयित आरोपी अनिल गावंडे यांनी शेख तालेब यांच्या नावाचा वापर करून एका खासगी बँकेत बनावट खाते उघडले होते. तसेच, नगर परिषदेतील ठेकेदारीच्या कामाचा ११ लाख २१ हजार ३२८ रुपयांचा चेक परस्पर काढून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. हा जुना गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी शेख तालेब यांना यापूर्वीही अनेकदा धमकावले होते. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी कोर्टासमोर केस मागे घे, नाहीतर, तुला खतम करू, अशी धमकी देण्यात आली होती. या संदर्भात तालेब यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार अर्ज दिला होता. मात्र, तरीही आरोपींनी धाडस करत आता थेट घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या फिर्यादीवरून भोकरदन पोलिसांनी संशयित आरोपी अनिल गावंडे आणि त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »