dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 15 लाखांची मदत : आमदार अर्जुन खोतकर , आमदार नारायण कुचे यांच्या मध्यस्थीने तोडगा  | Jalna News

Jalna News : जालना शहराजवळील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर अखेर अपघातग्रस्त कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आठ महिलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

जखमींनाही 4 लाखांची मदत, बैठकीनंतर तणाव निवळला

जालना :  शहराजवळील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर अखेर अपघातग्रस्त कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आठ महिलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

   बुधवार, 1 एप्रिल रोजी जालना तालुक्यातील कडवंची शिवारात समृद्धी महामार्गावर  शेतातून काम संपवून घराकडे निघालेल्या मजुरांच्या वाहनाला भरधाव ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात आठ मजुरांचा जागीच मृत्यू झाला.  या अपघातानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, 

आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांच्या मध्यस्थीने गुरुवार, 2 एप्रिल रोजी दुपारी अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा तोडगा काढण्यात आला. बैठकीनंतर मृतांच्या नातेवाईकांना तत्काळ 10 लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले असून, उर्वरित 5 लाख रुपये एका महिन्यात देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या अपघातानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी समाधानकारक मदतीशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. मात्र प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे अखेर मार्ग निघाला आणि वातावरण काही प्रमाणात निवळले.

दरम्यान, शासनाकडून यापूर्वीच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. आता गुत्तेदाराकडून मिळणाऱ्या मदतीमुळे अपघातग्रस्त कुटुंबीयांना एकूण आर्थिक आधार मिळणार आहे.

तथापि, समृद्धी महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top