dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शेतकऱ्याकडून चार हजाराची लाच स्वीकारणाऱ्या कृषी पर्यवेक्षकास रंगेहात पकडले ; मलकापूर येथील घटना

मलकापूर :  शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अॅन्टी करप्शन ब्युरोने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत मलकापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक ईश्वर भागवत सावकारे यांना ४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

मलकापूर :  शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अॅन्टी करप्शन ब्युरोने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत मलकापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक ईश्वर भागवत सावकारे यांना ४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत मळणीयंत्र खरेदी करून अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केल्याच्या मोबदल्यात सावकारे यांनी सुरुवातीला ५ हजार रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदार शेतकऱ्याने बुलढाणा लाचलूचपत विभागाकडे धाव घेतल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला. ९ फेब्रुवारी रोजी मलकापूर-बोदवड रोडवरील पिपंळगावदेवी फाट्याजवळ राधास्वामी सत्संग परिसरात ही कारवाई करण्यात आली. पंचासमक्ष लाच स्वीकारताना आरोपीला पकडण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे कृषी विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  लाचलूचपत विभागाने लाच मागणीबाबत तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top