dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मेहकरच्या युवकाचा लोणावळ्याच्या दरीत पडून मृत्यू 

मेहकर : पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या 26 वर्षीय युवकाचा लोणावळ्याच्या दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना 8 फेब्रुवारीच्या सायंकाळी घडली.

मेहकर : पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या 26 वर्षीय युवकाचा लोणावळ्याच्या दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना 8 फेब्रुवारीच्या सायंकाळी घडली.

येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत गिरी यांचा मुलगा प्रज्वल वय 26 हा  पुणे येथे बी एड चे शिक्षण घेत होता. तिथेच तो एमपीएससी परीक्षेची तयारीही करीत होता. 

8 फेब्रुवारी रोजी प्रज्वल हा त्याच्या नातेवाईकांसोबत कारने मुंबईवरून पुण्याला येत होता. लोणावळा येथे अल्पोपहार करण्यासाठी ही मंडळी थांबली. परंतु प्रज्वल व त्याचा मावस भाऊ या दोघा जणांनी आम्ही टेकडीवरून फिरून येतो ,असे सांगितले. त्यानंतर पाय घसरून प्रज्वल हा खोल दरीत कोसळला व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.  प्रज्वलचे वडील   प्रा.वसंत गिरी मेहकर येथील मे.ए.सो. महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत.’ वऱ्हाड निघालय लंडनला’ या एकपात्री नाटकाचे त्यांनी राज्यभर पाचशेहून अधिक प्रयोग केले आहेत. क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोगाचे त्यांनी हजारावर सादरीकरण केले आहे. त्यांची पाच पुस्तके प्रसिद्ध आहेत. एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यूमुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच गिरी कुटुंबीय रविवारच्या रात्री उशिरा पुण्याकडे रवाना झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top