dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

रिसोडमध्ये प्रतिष्ठेची लढत; झनक-पाचरणे आमनेसामने: सकाळीच मतदानाला वेग | A Prestige Battle in Risod: Jhanak and Pacharne Face Off

A Prestige Battle in Risod: Jhanak and Pacharne Face Off : अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज (दि. २९)मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळपासूनच मतदारांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली.

साडेबारा वाजेपर्यंत १०० टक्के मतदान पूर्ण 

रिसोड : अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज (दि. २९)मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळपासूनच मतदारांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली.

उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदानासाठी उत्साह दाखवला. साडेबारा वाजेपर्यंत सर्व ७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने तालुक्यात शंभर टक्के मतदान झाले.

या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील थेट लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार अमित झनक यांच्या मातोश्री शोभा झनक आणि माजी सभापती गजानन पाचरणे यांचे पुत्र डॉ. विठ्ठल पाचरणे यांच्यात सरळ सामना रंगला आहे. काँग्रेस विरुद्ध महायुती अशी ही प्रतिष्ठेची लढत ठरली असून आजी-माजी पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मतदान केंद्राबाहेर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते सक्रिय असून मतदारांना नाव शोधण्यासाठी तसेच इतर बाबींमध्ये सहकार्य केले जात आहे. आमदार अमित झनक स्वतः केंद्राबाहेर उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत होते.

दरम्यान, पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. या चुरशीच्या लढतीत मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top