dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दुबईत एशियन युथ पॅरा गेम्समध्ये बुलढाण्याच्या लेकीची दमदार कामगिरी : तुलिकाला मिक्स डबल्समध्ये सुवर्णपदक आणि एकेरीत रौप्यपदक

बुलढाणा : देशासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यासाठी क्रीडाक्षेत्राशी निगडीत गोड बातमी समोर आली आहे. दुबई येथे झालेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये भारतीय संघांनी दमदार कामगिरी करीत 56 पदके पटकाविली. विशेष म्हणजे, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील तुलिका सतीशचंद्र जाधव हिने रोमहर्षक प्रदर्शन करत संघासाठी पॅरा बॅटमिंटन या खेळ प्रकारात यशस्वी योगदान दिले. 

बुलढाण्याच्या तुलिकाने दुबईत मिक्स डबल्समध्ये सुवर्णपदक आणि महिला एकेरीत रौप्यपदक जिंकले. दुबई येथे एशियन युथ पॅरा गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. 7 ते 14 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. यामध्ये, भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली आणि एकूण ५६ पदके जिंकली, ज्यात १९ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्य पदकांचा समावेश आहे. याक्रीडा महोत्सवात 45 देशांतील सुमारे 1 हजार 500 युवा पॅरा-खेळाडू सहभागी झाले होते. विविध खेळ प्रकारात भारतीय संघातील 115 हून अधिक युवा पॅरा खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले.

11 खेळांचा समावेश

एशियन यूथ पॅरा गेम्समध्ये एकूण 11 खेळांचा समावेश आहे. पॅरा तिरंदाजी, पॅरा ऍथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, बोकिया, गोलबॉल, पॅरा पॉवरलिफ्टिंग, पॅरा पोहणे, पॅरा तायक्वांदो, पॅरा टेबल टेनिस, व्हीलचेअर बास्केटबॉल, आणि पॅरा-आर्मरेसलिंग असे खेळ प्रकार यात आहेत. 

बुलढाण्यातील क्रीडाविश्वात नवचैतन्य.. 

तुलिकाने पॅरा बॅटमिंटन मिक्स डबल्समध्ये सुवर्णपदक आणि महिला एकेरीत रौप्यपदक जिंकले. तिच्या यशाबद्दल भारतीय संघात आनंदाचे वातावरण आहे. तुलिका सतीशचंद्र जाधव ही बुलढाणा मुख्यालयातील रहिवासी असून तिच्या दैदीप्यमान कामगिरीने जिल्ह्याच्या क्रीडाविश्वात नवचैतन्य पसरले आहे. तिच्या यशाबद्दल राज्यभरातील क्रीडा संस्थांकडून कौतुकाचे संदेश मिळाले. तसेच, अदिती अर्बनचे संस्थापक तथा दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक सुरेश देवकर यांनीही तुलिकाच्या कामगिरीबद्दल कौतूक केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top