dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दूध घेण्याच्या कारणावरून वाद; संतापलेल्या पत्नीनं पतीच्या मांडीत चाकू खुपसला! 

मोताळा : मोताळा शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दूध घेण्याच्या शुल्लक कारणावरून  झालेल्या वादात  संतापलेल्या पत्नीने पतीच्या मांडीत चाकू खुपसून जखमी केले. आज ७ जानेवारीला सकाळी मोताळा शहरातील सर्वेश्वर नगरात ही घटना घडली. 

  चाकू हल्ल्यात जखमी झालेले फोटोग्राफर मंगेश गवळी (३० वर्ष) यांनी  बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार,  शनिवारी सकाळी ते आणि  पत्नी प्रिया हे दोघे घरी होते. दरम्यान, दूध घेण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. काही वेळानंतरच हा इतका टोकाला गेला की, संतापलेल्या प्रिया गवळी यांनी  पती मंगेश यांच्या उजव्या मांडीत चाकूने वार केला. यात मंगेश यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top