dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

प्रविण तोगडिया यांच्या  दौऱ्यानिमित्त टेंभुर्णीला आले छावणीचे स्वरूप | Pravin Togadia

Pravin Togadia : जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे बजरंग दलाचे राष्ट्रीय नेते प्रविण तोगडिया हे संघटनेच्या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिरास मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्त पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून शनिवार, 11 एप्रिल रोजी पोलिसांनी मॉकड्रील केल्याने टेंभूर्णीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहेत.

अकोलादेव : जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे बजरंग दलाचे राष्ट्रीय नेते प्रविण तोगडिया हे संघटनेच्या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिरास मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्त पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून शनिवार, 11 एप्रिल रोजी पोलिसांनी मॉकड्रील केल्याने टेंभूर्णीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहेत.

भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी पोलिसांचे फिक्स पाँईट आखून टेंभुर्णी शहरातील विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. प्रविण तोगडिया यांचे शनिवार, 11 एप्रिल रोजी रात्री आगमन होणार असून रविवार, 12 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता ते महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून आभिवादन  करणार आहे. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता दत्त मंदिर येथील सामाजिक सभागृहात राष्ट्रीय बजरंग दल कार्यकर्ते शिबीर व व्यापारी मंडळींसोबत चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी संपूर्ण टेंभुर्णी शहरातील मुख्य रस्त्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top