dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गुटखा घेऊन जाणारा मेटेडोर पकडला, अंदाजे वीस लाखांचा गुटखा जप्त, जलंब पोलिसांची कारवाई  

खामगाव :  मध्यप्रदेश मधून खामगाव कडे येणारा अवैध गुटखा जलम पोलिसांनी सापळा रचून नांदुरा मार्गावरील लांजोड फाट्याजवळ पकडल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. यावेळी जलंब पोलिसांनी मॅटर मध्ये अंदाजे वीस लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.

      जलंब पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मध्यप्रदेश येथून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला अवैध गुटखा नांदुरा मार्गे जलंब हद्दीतून खामगाव कडे वाहतूक होत  असल्याची  माहिती मिळाली. या माहितीवरून जलंब पोलिसांनी लांजुळ फाट्यावर सापळा रचून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली असता नांदुरा कडून खामगावच्या दिशेने येणारा मेटेडोर क्रमांक  एमएच 09 ईएम ९९९४ या वाहनाला अडवून त्याची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यात बंदी घातलेला नागरिकांच्या जीवितास अपायकारक असलेला तंबाखूजन्य सुगंधित गुटखा आढळून आला. यावेळी पोलिसांनी सदर वाहनाला ताब्यात घेऊन गुटखा जप्त केला आहे. वाहनाला जलंब पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असून अंदाजे वीस लाखांचा गुटखा पकडल्याची माहिती समोर येत आहे. सदर गुटखा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात वाहतूक केला जात असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई  सुरू होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top