Atul Parchure passed away : ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

Atul Parchure passed away

Atul Parchure passed away : पु.लंची शाबासकी मिळवणारा हरहुन्नरी कलाकार अभिनेता अतुल परचुरे यांचे सोमवार १४ ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Atul Parchure passed away

मुंबई : पु.लंची शाबासकी मिळवणारा हरहुन्नरी कलाकार अभिनेता अतुल परचुरे यांचे सोमवार १४ ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, कर्करोगातून बाहेर पडल्यावर त्यांच्या जिद्दीचं सर्वत्र कौतुक झालं होतं, मात्र सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
व्यक्ती आणि वल्ली या नाटकात पु. ल. देशपांडे यांची भूमिका अतुलने साकारली आणि पु.ल. देशपांडे यांनी ती पाहिली आणि अतुलला शाबासकी दिली होती. अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता, त्यातूनही ते बाहेर आले होते, त्यांच्या जिद्दीचं कौतुक झालं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्याच्या मागे त्याची आई, पत्नी आणि मुलगी असं कुटुंब आहे. नाटक, सिनेमा, चित्रपट या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. अतुलला कर्करोग झाला हे ऐकून अनेकांना धक्का बसला होता. त्यांनी त्यांच्या वेदना विविध मुलाखतींमध्ये सांगितल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »