Earthquake in Akola, Amravati :अकोला, अमरावती जिल्ह्यात बसले भूकंपाचे धक्के

Earthquake in Nanded, Hingoli

Earthquake in Akola, Amravati : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर अंजनगाव सुर्जी तालुका भूकंपाच्या धक्क्यानं हादरल्याची माहिती समोर आली. सोमवार २९ सप्टेंबर रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे हे धक्के अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यातही जाणवले.

Earthquake in Akola, Amravati
Earthquake in Akola, Amravati

अमरावती/अकोला : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर अंजनगाव सुर्जी तालुका भूकंपाच्या धक्क्यानं हादरल्याची माहिती समोर आली. सोमवार २९ सप्टेंबर रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे हे धक्के अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यातही जाणवले.  भूकंपाच्या धक्क्यामुळं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
भूकंपाचे धक्के बसताच मेळघाटातील अनेक गावात खळबळ उडाली. घराशेजारी काहीतरी जोरदार पडलं असावं, असा भास होताच गावातील महिला, पुरुष, लहान मुलं सर्वजण घराबाहेर धावत आल्याची माहिती मोठा येथील रहिवासी गजानन शनिवारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. धामणगाव गडी या गावात देखील भूकंपाचे धक्के बसताच खळबळ उडाली. गावातील सर्व नागरिक मोकळ्या जागेवर धावत एकत्र आल्याची माहिती धामणगाव गढी येथील रहिवासी रमेश जोशी यांनी दिली. अंजनगाव सुर्जी शहरात देखील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

मेळघाटातील अनेक गावात खळबळ

मेळघाटातील अनेक भागावांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. भकंपाचे धक्के बसल्याने मेळघाट परिसरातील चिखलदरा मोथा, सलोना चौराकुंड, सेमाडोह, हरीसाल आदी गावातील ग्रामस्थ घराबाहेर पडल्याची माहिती स्थानिकांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अचलपूरपासून ४०० मीटरवर केंद्र

भूकंपाचा सर्वाधिक हादरा हा अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांना बसला. भूकंपाचं केंद्र हे अचलपूर पासून ४०० मीटर अंतरावर असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. दरम्यान भूकंपाचे धक्के बसल्यामुळं अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, धारणी या चारही तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झाले.

अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हाऱ्यात सोम्य धक्के

अमरावती जिल्ह्याला लागून असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील काही गावांना देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अकोट तहसीलदार यांचेकडून प्राप्‍त माहीतीनुसार मौजे रुधाडी, खिरकुंड ,प्रिंपी जैनपुर या गावामध्‍ये सौम्‍य धक्‍के जाणवल्‍याचे गावातील नागरीकांचे म्‍हणणे असुन सदर ठिकाणी कोणतीही जिवीत व वित्‍तहानी नाही. तसेच तहसीलदार तेल्‍हारा यांनी दिलेल्या माहीतीनुसार तेल्‍हारा तालुक्‍यातील हिवरखेड येथे सौम्‍य धक्‍के जाणवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »