छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकातून नाशिककडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीच्या पुढील चाकाचा रॉड अचानक तुटल्याने बस अनियंत्रित होण्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास पिंपळगाव फाट्याजवळ मुंबई-छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावर घडली.

पिंपळगाव फाट्याजवळील घटना; सुदैवाने जीवितहानी नाही
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकातून नाशिककडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीच्या पुढील चाकाचा रॉड अचानक तुटल्याने बस अनियंत्रित होण्याची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास पिंपळगाव फाट्याजवळ मुंबई-छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावर घडली.

एमएच १४ एमएच ०५५० क्रमांकाची ही बस पुढील चाकाचा रॉड तुटल्यानंतर सुमारे शंभर फूट फडफडत गेली. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. बसमधील ४२ प्रवासी सुखरूप असून, कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच रायपूर येथील समाजसेवक अशोक कीर्तीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्व प्रवाशांची आस्थेने विचारपूस केली. तसेच चालक व वाहकाशी संवाद साधून त्यांना धीर दिला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.


