dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

चालठाणा शिवारात दोन बिबट मृत आढळले : आपापसातील झुंजीतून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

जळगाव जामोद :   चालठाणा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 623 मध्ये दोन बिबट मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना समोर आली आहे. 21 नोव्हेंबर रोजी वनरक्षक आर. के. राऊत हे वनमजुरासह परिसरात गस्तीवर असताना त्यांना दोन्ही बिबट्यांचे मृतदेह आढळले. या घटनेची गंभीर दखल घेत वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील विविध कलमान्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.

            यानंतर सहायक वनसंरक्षक बुलडाणा, पशुधन विकास अधिकारी जामोद आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक जळगाव जामोद यांच्या उपस्थितीत दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनादरम्यान या दोन बिबट्यांचा मृत्यू आपापसातील झुंजीमुळे झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. बिबट हा वन्यप्राणी अनुसूची-1 मध्ये समाविष्ट असल्याने शास्त्रोक्त पद्धतीने विविध नमुने संकलित करण्यात आले असून, ते तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा, अमरावती येथे पाठविण्यात येत आहेत. त्यानंतर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नुसार शवांची विल्हेवाट लावण्यात आली. या वनगुन्ह्याचा पुढील तपास मुख्य वनसंरक्षक अमरावती ज्योती बॅनर्जी, उपवनसंरक्षक प्रादेशिक बुलडाणा जमीर शेख आणि सहायक वनसंरक्षक प्रादेशिक व कॅम्पा विजक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे जळगाव जामोद करीत आहेत. या कारवाईसाठी वनपाल बडगुजर, वनरक्षक राऊत, कडवकर, हागोणे, अब्दुल सादीक आणि इतर वनकर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top