dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; धरणगाव परिसरात उघडकीस आली घटना 

मलकापूर : स्थानिक व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये द्वितीय सत्रात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील धरणगावनजीक शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना 22 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. समाधान सुनील म्हस्के रा. पांढरदेव, ता. चिखली असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

         समाधान हा मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील गजानन नगरी येथे भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण घेत होता. 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मित्राची दुचाकी घेऊन ‘झेरॉक्स आणायला जातो’ असे सांगून तो बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो परतला नसल्याने मित्रांनी त्याच्या पालकांना माहिती दिली व रात्रभर शोधाशोध केली. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी त्याचे वडील सुनील म्हस्के व नातेवाइकांनी मलकापूर गाठून कॉलेज व शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये तो धरणगावच्या दिशेने जाताना दिसला. महामार्गावरील फौजी ढाब्यानजीक त्याची दुचाकी उभी आढळल्यानंतर परिसरातील शेतात शोध घेतला असता, झाडाच्या फांदीला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच शहर पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top