dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बुलढाण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अमित नारडिया यांची आत्महत्या! 

बुलढाणा :  येथील प्रसिद्ध प्रकाश जनरल स्टोअर्सचे मालक अमित प्रकाश नार्डिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 44 वर्षीय अमित नारडिया यांची आत्महत्या अनेकांसाठी धक्कादायक ठरली असून त्यांचा मित्रपरिवार या घटनेने सुन्न झाला आहे. मलकापूर रोडवरील आपल्या निवासस्थानी सर्वात वरच्या मजल्यावर पंख्याला लटकून अमित नारडिया यांनी आपले जीवन संपविले. रात्री वरच्या बेडरूममध्ये ते एकटेच झोपलेले होते. सकाळी कॉल करूनही ते उठत नाही म्हणून कुटुंबियांना शंका आली.

बुलढाणा :  येथील प्रसिद्ध प्रकाश जनरल स्टोअर्सचे मालक अमित प्रकाश नार्डिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. 44 वर्षीय अमित नारडिया यांची आत्महत्या अनेकांसाठी धक्कादायक ठरली असून त्यांचा मित्रपरिवार या घटनेने सुन्न झाला आहे. मलकापूर रोडवरील आपल्या निवासस्थानी सर्वात वरच्या मजल्यावर पंख्याला लटकून अमित नारडिया यांनी आपले जीवन संपविले. रात्री वरच्या बेडरूममध्ये ते एकटेच झोपलेले होते. सकाळी कॉल करूनही ते उठत नाही म्हणून कुटुंबियांना शंका आली. खिडकी तोडून जेव्हा त्यांचा भाऊ आशिष बेडरूममध्ये गेला, तेव्हा त्याला फासावर लटकलेला आपला मोठा भाऊ अमित दिसला. सकाळी 8:15 वाजेदरम्यान ही घटना उजागर झाली. त्यांच्या मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड तातडीने नारडिया यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. अमित नारडिया हे आमदार गायकवाड यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. अमित यांच्या मृत्यूचा आ. गायकवाड यांनाही धक्का बसला आहे. नारडिया परिवार खूप मोठा आहे. अमित नारडिया यांना तीन मुले आहेत. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. घरगुती वाद, आर्थिक परेशानी की, आणखी बाहेरचे कुठले कारण, यातील नेमके कारण माहिती नाही. परंतु अमित नारडिया यांची आत्महत्या अनेकांना हेलावून सोडणारी आहे. जो अनेकांची भांडणे सोडवत होता, कलह मिटवायचा त्या अमितला स्वतःचा कुठला कलह मृत्यूपर्यंत घेऊन गेला, हे पोलिसांना कळू शकेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top